RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


संगणक आणि इंटरनेट

ब्लॉगींग टिप 10 : कायदेशीर आणि नैतिकतेची बंधने पाळा
तुमचा ब्लॉग हे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे हे खरे पण हक्क म्हटला की कर्तव्येही आलीच. तुमचे ब्लॉगवरचे लेखन हे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत बसणारे असले पाहिजे. किंबहुना ही काळजी घेणे प्रत्येक लेखकाचे कर्तव्यच आहे. ही बंधने प्रामुख्याने खालील तीन प्रकरणांमधे मोडली जातात.
Posted On : 17 Oct 2010
ब्लॉगींग टिप 9 : ब्लॉगच्या नोंदींचा बॅकअप जरूर घ्या
ब्लॉगींगच्या वेब साईटस नोंदी लिहिण्यासाठी ऑनलाईन एडिटरची सुविधा पुरवत असतात. असे जरी असले तरी प्रत्येक नोंद प्रथम आपल्या कॉम्प्युटरवर लिहा (नोटपॅड, एक्स्प्रेशन वेब, वर्ड किंवा तुमच्या आवडीचा कोणताही HTML Editor तुम्ही यासाठी वापरू शकता) आणि मगच ती ऑनलाईन एडिटरमध्ये टाका. याचा एक फायदा असा की तुमच्याकडे नोंदीची प्रत राहते आणि दुसरे म्हणजे spell checking वगैरे करायचे असेल तर सोपे जाते.
Posted On : 16 Oct 2010
ब्लॉगींग टिप 8 : नोंदी प्रकाशित करण्याचे वेळापत्रक असु द्या
साधारणतः ब्लॉग लेखक जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नोंदी लिहीत आणि प्रकाशित करत असतो. बहुतेकांचा ब्लॉग हा मोकळ्या वेळात करण्याचा उद्योग असल्याने त्यात चुक असे काही नाही. परंतू नोंदी प्रकाशित करण्याचा काहीतरी pattern ठरवा.
Posted On : 15 Oct 2010
ब्लॉगींग टिप 7 : प्रतिक्रिया देण्या-घेण्यात तारतम्य बाळगा
बहुतेक ब्लॉग्सवर नोंदीवर प्रतिक्रिया देण्याची सोय असते. प्रतिक्रियांची देवाण घेवाण करताना तारतम्य बाळगणे आवश्यक ठरते. प्रतिक्रियांद्वारे Interactivity हे जरी ब्लॉगचे महत्वाचे वैशिष्ठ असले तरी अशी देवाण घेवाण केलीच पाहिजे असे कडक बंधन अजिबात नाही. अनेक ब्लॉग इंजिन्समधे प्रतिक्रियांची सोय बंद करता येते.
Posted On : 14 Oct 2010
ब्लॉगींग टिप 6 : विजेटचा आणि जाहिरातींचा अतिवापर टाळा
ब्लॉगर, वर्डप्रेस सारख्या साईटसचे ब्लॉगधारक आपल्या ब्लॉगवर अनेक प्रकारची विजेटस टाकतात. विजेटच्या गर्दी केल्याने वाचकाचे लक्ष विचलीत होऊ शकते. लक्षात ठेवा की ब्लॉग हा वाचनाच्या दृष्टीने सुटसुटीत असला पाहिजे. एकादे विजेट वापरताने ते खरोखरच उपयोगी आहे का (तुम्हाला किंवा वाचकांना) ते नीट पारखून पहा. काही विजेटस नुसती जागा अडवतात. त्यांचा ब्लॉगच्या दृष्टीने फारसा उपयोग नसतो.
Posted On : 13 Oct 2010
ब्लॉगींग टिप 5 : तात्कालिक माहितीबरोबरच दिर्घजीवी माहिती द्या
तुमच्या ब्लॉगवरील माहिती ही तात्कालिक आणि दिर्घजीवी अशा दोन स्वरूपाची असु शकते. तात्कालिक माहिती म्हणजे अशी माहिती की जी काळावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, काल पडलेल्या पावसाचे वर्णन वा चालू असलेल्या क्रिकेटच्या सामच्याचे वर्णन. अशी माहिती फक्त काही दिवसांपुरतीच महत्वाची असते.
Posted On : 12 Oct 2010
ब्लॉगींग टिप 4 : ब्लॉगवर आपली ओळख जरूर द्या
ब्लॉग हा खरेतर तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख असतो. अनेकदा ब्लॉगर्स "About" किंवा "माझ्या विषयी" पानावर स्वतःविषयी काहीतरी काव्यमय वा गमतीदार लिहितात. जर ब्लॉग लेखकाला तसे लिहायचे असेल तर जरूर लिहावे पण त्याबरोबर स्वतःची खरी ओळखही द्यावी. त्याने तुमच्या ब्लॉगला authenticity येते. लक्षात ठेवा की वाचकाला काय लिहिलय या बरोबरच कुणी लिहिलय यातही रस असतो.
Posted On : 11 Oct 2010
ब्लॉगींग टिप 3 : नोंदींचा दर्जा नोंदींच्या संख्येपेक्षा महत्वाचा
अनेकदा ब्लॉग लेखकाचा असा समज असतो की रोज वा 3-4 दिवसांनी ब्लॉगवर नोंद टाकलीच पाहिजे. ब्लॉगींगचा असा कोणताही नियम नाही. आपण नोंद टाकली नाही तर वाचक काय म्हणतील, आपला वाचकवर्ग दुरावेल, ब्लॉगच्या हिटस कमी होतील अशा एक ना अनेक शंका ब्लॉग लेखकाच्या मनात असतात. ब्लॉगचा बाबतीत नेहमी असे म्हटले जाते की Content is the King. याचाच अर्थ तुम्ही किती नोंदी टाकताय या पेक्षा त्या नोंदींचा दर्जा काय आहे ते जास्त महत्वाचे.
Posted On : 10 Oct 2010
ब्लॉगींग टिप 2 : ब्लॉग तुमच्यासाठी आहे तुम्ही ब्लॉगसाठी नाही हे लक्षात ठेवा
दिर्घ काळ ब्लॉगींग करू इच्छिणार्‍यांसाठी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण ब्लॉगिंग का करत आहोत ते स्वतःशी नीट ठरवा. ब्लॉगींग करण्यामागे अनेक कारणे असु शकतात जसे प्रसिद्धी, जाहिरातींद्वारे आर्थिक उत्पन्न, आपल्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवणे, मनातले दबलेले विचार मोकळे करणे, विरंगुळा, आपल्या साहित्य प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे इत्यादी इत्यादी. कारण काहीही असले तरी तुमच्यासाठी ब्लॉग आहे ब्लॉग़साठी तुम्ही नाही हे लक्षात ठेवावे.
Posted On : 09 Oct 2010
ब्लॉगींगची दहा वर्षे आणि दहा टिप्स
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझ्याकडून पूर्वी डॉट नेट शिकून गेलेला एक जण काही अन्य कारणासाठी आला होता. बोलता बोलता डॉट नेट विषयीच्या वेब साईटस, ब्लॉग्स याविषयी विषय निघाला. त्याच्याशी बोलताना सहज लक्षात आले की मी ब्लॉगींग करायला सुरवात करून दहा वर्ष झाली आहेत.
Posted On : 08 Oct 2010

Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web