RSS Feed




More...






Visit blogadda.com to discover Indian blogs


Untitled 1

एकांतवासात सापाशी गाठ

काही महिन्यांपूर्वी एकांतवासात असताना घडलेली घटना. उन्हं कलल्यावर जरा फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. आवारातच झाडांची पहाणी करत हिंडत होतो. अचानक डोक़्यावर काहीतरी हलल्यासारखे वाटले. निरखून बघतो तर एक गलेलठ्ठ साप बहाव्याच्या फांदीवर लटकत होता. मला वाटले हरणटोळ असेल म्हणून फारसे लक्ष न देता माझे काम सुरूच ठेवले. काहीवेळाने जवळचे गावकरी येताना दिसले. माझा अंदाज खरा की खोटा हे पडताळून पाहण्यासाठी त्यांना बोलावले. त्यांनी त्या सापाचे नाव 'चापट्या' असे सांगितले. तो विषारी आहे असेही ते म्हणाले. अगदी नाग किंवा फुरस्यासारखा प्राणघातक नसले तरी त्याचे विष त्रासदायक असते असे ते म्हणाले.

विषारी सापाच्या सहवासात राहणे हे धोकादायक असले तरी ते विनाकारण कोणावर हल्ला करत नाहीत. ती सवय केवळ माणसातच आढळले. त्यामुळेच की काय त्यांनी मी नको नको म्हणत असतानाही त्यानी त्याला झाडावरून खाली पाडले. तो खाली पडताच त्याच्या लठ्ठपणाचे रहस्य समजले. नुकतेच त्याने काहीतरी भरपेट खाल्ले होते. त्यामुळेच त्याला जलदगतीने हालचाल करता येत नव्हती. दोन चार गावकर्‍यांनी त्याला काठीने मारले. त्या बिचार्‍याची काय चूक होती? कुठून त्या गावकर्‍यांना बोलावले असे मला वाटले. असो. त्याचा जीवंत असतानचा हा फोटो.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+


Tags : साप एकांतवास
Posted On : 01 Sep 2009
Current Rating :
Rate this product :


This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape


Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web