RSS Feed
RSS Feed
Search
AddThis Feed Button
Bookmark and Share





Visit blogadda.com to discover Indian blogs


Kundalini Yoga

देवाच्या डाव्या हाती

लेखक : श्री. बिपीन जोशी
पृष्ठे : 109
आकार : 5 इंच X 7 इंच
किंमत : Rs.55/- (टपाल खर्च अतिरीक्त)

(पुस्तक विकत घेण्यासंबंधी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.)

पुस्तका विषयी...

कुंडलिनी योग अध्यात्म जीवनाचा राजमार्ग आहे. जगदंबा कुंडलिनीला जागृत करून तीचे सहस्रार स्थित शिवाशी सामरस्य घडवून आणणे हे कुंडलिनी योगमार्गाचे मुलतत्व. अनेकदा कुंडलिनी योग गूढतेच्या अनावश्यक धुक्याने वेढलेला आठळतो. हा मार्ग फक्त जंगलात वा हिमालयात वास्तव्य करणार्‍या योग्यांसाठीच आहे असा गैरसमज बहुतांशी लोकांमधे आढळतो.

संपूर्णतः योगजीवनाला वाहून घेण्यापूर्वी श्री. बिपीन जोशी हे एक Microsoft .NET या विषयातील एक मान्यवर संगणक सल्लागार, प्रशिक्षक आणि लेखक होते. 'देवाच्या डाव्या हाती' या पुस्तकात त्यांनी स्वतःचे कुंडलिनी योगमार्गावरील अनुभव विषद केले आहेत. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांनी मोठ्या जिद्दीने हा प्रवास कसा पार केला याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. सामान्यतः कुंडलिनी योगावरील पुस्तकात लेखक प्राचीन ग्रंथांवरून बेतलेले ज्ञान प्रसारीत करताना दिसतात. अशा पुस्तकांमधे प्रत्यक्ष लेखकाचा स्वानुभव प्रकट होताना क्वचितच आढळतो. हे पुस्तक या बाबतीत अगदी वेगळे आहे. लेखकाने आपला योगमार्गावरचा प्रवास वर्णन करतानाच नवीन साधकांसाठी बहुमूल्य मार्गदर्शनही केले आहे. तेही अत्यंत सोप्या, सुलभ आणि प्रभावी भाषेत.              

अनुक्रमणिका

  • एक विचित्र घटना
  • गुरुचा शोध
  • मी नोकरी सोडतो
  • त्र्यंबकेश्वरला दाखल
  • कुंडलिनी जागृती
  • अद्भुत स्वप्न आणि दीक्षा
  • मी परत येतो
  • नवी साधना आणि उत्फुर्त क्रिया
  • कर्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम
  • योगारूढ
  • साधक प्रश्नावली

पुस्तक विकत कसे घ्यावे?

खालीलपैकी कोणत्याही मार्गाने आपण पुस्तक मागवू शकता:

आमच्या कार्यालयातून विकत घ्या

हे पुस्तक आमच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी येथे सम्पर्क साधावा. आपल्याला पुस्तकाची संपूर्ण किंमत रोख भरावी लागेल याची कृपया नोंद घ्यावी.

हे पुस्तक मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे यांच्याकडेही उपलब्ध आहे.

पुस्तक कुरीयरद्वारे मागवणे

आपण भारतभर कोठेही पुस्तक कुरीयरने मागवू शकता. कुरीयरचा खर्च कळण्यासाठी आपला संपूर्ण पत्ता येथून आम्हाला पाठवावा. आम्ही कुरीयरचा खर्च कळविल्यावर आपण आपले पैसे डिमांड ड्राफ्टने अथवा चेकने पाठवू शकता. आपला डिमांड ड्राफ्ट वा चेक वठल्यावरच पुस्तक पाठविले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.


This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape

Posted On : 18 Jun 2009



Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Copyright & Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web